पाचोरा | प्रतिनिधी
येथील मिलिंद हौसिग सोसायटी भागातील संजय अमृत अहिरे वय (४६)यांचे दि.१ रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास निधन झाले,त्यांना उष्माघाताचा त्रास झाल्याने चक्कर येऊन पूर्ण अंगाला घाम येत होता मात्र सकाळी दवाखाण्यात जाण्याच्या आधीच ते मृत पावले त्यांचे पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.ते पाचोरा नगरपालिकेत स्वच्छता विभागात कार्यरत होते.त्यांनी दि.३१ रोजी भर उन्हात सेवा बजावली होती तेव्हा पासून त्यांना त्रास जाणवत होता. ते पाचोरा येथील पाचोरा पीपल्स बँकेचे कर्मचारी राजू अहिरे यांचे बंधू होत.त्यांच्या मागे पत्नी,१ मुलगा १ मुलगी असा परिवार आहे.