Thursday, February 2, 2023

पाचोऱ्यातील जैन स्मारकात भाविकाच्या अंगावर पडला चक्क केशरचा पाऊस…..

- Advertisement -

पाचोरा |  प्रतिनिधी

पाचोरा शहरातील संघवी कॉलनी येथे स्थित स्व. अॅड. सुभाषचंद स्वरुपचंद संघवी जैन स्मारक आहे. या स्मारकात अनेक भाविक येवुन नवकार महामंत्र जपाचे नियमित पठण करत असतात. दि. १७ रोजी पहाटे ६ वाटेच्या सुमारास नित्य नियमाप्रमाणे येथील पुनमचंद चंपालाल जैन कापड दुकानाचे संचालक संजयकुमार बडोला हे नवकार महामंत्र जप चे पठण करत असतांनाच १० व्या माळेच्या प्रसंगी अचानक त्यांचे अंगावर केशरचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली. संजयकुमार बडोला हे सदरचा प्रकार अनुभवताच आश्चर्यचकित झाले. त्यांनी तात्काळ त्यांचे निकटवर्तीय राजेश संघवी यांना आवाज देवुन बोलवुन प्रकार सांगता राजेश संघवी यांनी सुद्धा सदरचा प्रकार त्यांच्या डोळ्यांनी बघताच आश्चर्य व्यक्त करत समाज बांधव व भगिनींना याबाबत कळविताच भाविकांनी जैन स्मारकात एकच गर्दी केली. या घडलेल्या चमत्काराची परिसरात एकच चर्चा असुन अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. याप्रसंगी जैन स्मारकात जयकिरण प्रभाजी न्यु इंग्लिश मिडियम स्कुलचे अध्यक्ष दिनेश बोथरा, आनंद संघवी, सह जैन समाज बांधव व भगिनींनी भेट देऊन घडलेल्या चमत्कारा विषयी माहिती जाणून घेतली. तसेच नागरिकांनीही नवकार महामंत्राचा जाप करावा असे आवाहन जैन समाज बांधवांनी उपस्थितांना केले.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे