पाचोरा (प्रतिनिधी) : दि. २४ रोजी मुंबईहुन पाचोरा कडे येत असतांना माजी आमदार दिलीप वाघ यांच्या गाडीला मुंबई बाहेरील फ्रीवे वर अपघात झाला. या अपघातात दिलीप वाघ यांच्या वाहनाला प्रचंड मोठे नुकसान झाले असले तरी परमेश्वराची कृपा व जनतेच्या आशिर्वादाने दिलीप वाघ हे बालबाल बचावले. या घटनेचे वृत्त कळताच दिलीप वाघ यांच्या असंख्य चाहत्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून दिलीप वाघ यांच्याशी संपर्क करून विचारपूस केली.
माजी नगराध्यक्ष पंडित शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पाचोरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पंडित शिंदे यांनी दि. २५ रोजी माजी आमदार दिलीप वाघ यांची सदिच्छा भेट घेतली. माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत अपघाताविषयीच्या चर्चे सोबतच दोघांमध्ये नगरपालिकेच्या जुन्या कार्यकाळातील गप्पा रंगल्या. यावेळी गिरणाई शिक्षण संस्थेचे सहसचिव शिवाजी शिंदे, सामाजिक नेते खलिल देशमुख, रणजीत पाटील, जगदिश सोनार, एस. एल. पाटिल , प्रा. आकाश वाघ उपस्थित होते.