पाचोऱ्याचे आचल अग्रवाल व अतुल पटवारी सी.ए.परीक्षा उत्तीर्ण

0

पाचोरा (प्रतिनिधी) : येथील आचल मोहन अग्रवाल व अतुल सुरेश पटवारी या विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या दि. इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया (सी.ए.) या परीक्षेत यश संपादन केले. आचल अग्रवाल ही येथील शरद ट्रेडिंग कंपनीचे संचालक मोहन अग्रवाल यांची कन्या असुन अतुल पटवारी हा अतुल एजन्सीजचे मालक सुरेश पटवारी यांचा मुलगा आहे. त्यांच्या या यशाबद्दल पाचोरा शक्तिधम परिवारातर्फे व राजस्थानी – अग्रवाल समाजातर्फे  शक्ती धाम येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.