पाचोरा (प्रतिनिधी) : येथील चिंतामणी काॅलनीतील रहिवासी कु. निसर्गा गुतवंतराव पवार हिची नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पर्यावरण शास्र विषयाच्या अभ्यास मंडळावर निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
कु. निसर्गा पवार हिस नुकतेच विद्यापीठाचे उपकुलसचिव ए. एच. मनोरे यांनी एक वर्षासाठी निमंत्रित सदस्य म्हणून निवडीचे पत्र पाठविले आहे. कु. निसर्गा पवार हि गोराडखेडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक गुणवंतराव वामनराव पवार यांची सुकन्या आहे. मागील वर्षी तीला एम. एस्सीत सुवर्ण पदक मिळाले होते. त्या या निवडी बद्दल कॉलनीचे अध्यक्ष डॉ. गणेश राठोड, सचिव विनायक दिवटे, मुख्याध्यापक भोसावी यांनी अभिनंदन केले आहे.