पाचोर्‍यात ५ वी ८ वी शिषवृत्ती परिक्षा संपन्न

0

पाचोरा – शिक्षण विभागातर्फे घेण्यात येणार्‍या इयत्ता ५ वी व ८ वी ची शिष्यवृत्ती परिक्षा, पाचोरा तालुक्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. इयत्ता ५ वी साठी १२६० विद्यार्थ्यांनी तर इयत्ता ८ वी साठी ८२० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली.

पाचोरा शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, सरोज गायकवाड यांच्यासह, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विषयतज्ञ, तालुका समन्वयक व विशेष शिक्षक यांनी या परिक्षा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी तालुक्यातील बुर्‍हाणी इंग्लिश मेडीयम, माध्यमिक विद्यालय  वरखेडी, पिंपळगाव, लोहारा, नांद्रा, नगरदेवळा व पी.के.शिंदे या सात परिक्षा केंद्रांवर १ हजार ४०७ परिक्षार्थीपैकी १ हजार २६० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली १४७ विद्यार्थी या परिक्षेस गैरहजर होते. तर ८ वी  च्या ८६८ विद्यार्थ्यांपैकी ८२० विद्यार्थ्यांनी तालूक्यातिल ६ केंद्रावर परिक्षा दिली यात गो.से. हायस्कुल पाचोरा, तावरे माध्यमिक, नगरदेवळा माध्यमिक, पिंपळगाव माध्यमिक, सामनेर माध्यमिक व कुर्‍हाड माध्यमिक यांचा समावेश आहे. ८ वी चे ४८ विद्यार्थी गैरहजर होते. परिक्षा यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी परिक्षम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.