पाचोर्‍यात ओ.बी.सी.आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाचे चक्काजाम आंदोलन

0

पाचोरा (प्रतिनिधी) : येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ओ.बी.सी. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकाळी ११:३० वाजता जारगाव चौफुली येथे चक्काजाम आंदोलन करत तीव्र निषेध करण्यात आला. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणासह आता ओ.बी.सी. आरक्षण सुद्धा गेले असून आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही. महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात वारंवार सूचना करून देखील या निष्क्रिय सरकारने इम्पेरियल डाटा न दिल्याने ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्यात आले.

तसेच हे सरकार जाणीवपूर्वक हे सर्व घडवून आणत असून या मागचा नेमका उद्देश काय? असा सवाल उपस्थित भा.ज.पा. पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला तसेच यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि जवळपास अर्धातास जारगाव चौफुली येथे आंदोलकांनी सर्व वाहतूक थांबवून ठेवली होती. त्यामुळे जवळपास एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या  त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करत पोलीस वाहनात बसून पाचोरा पोलीस स्टेशन ला नेऊन त्यांची सुटका करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सतीश शिंदे, विधानसभा क्षेत्र प्रमुख हिंमतसिंह निकुंभ, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, शहराध्यक्ष रमेश वाणी, सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील, दीपक माने, राजेश संचेती, ओ.बी.सी. मोर्चा तालुका अध्यक्ष गोविंद पाटील, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष गोविंद देवरे, भाजपा उपाध्यक्ष प्रमोद सोमवंशी, महेश पाटील, किरण पांडे,शरद पाटील, भा.ज.यु.मो. तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, शांतीलाल तेली, नामदेव पाटील, मुस्लिम बागवान, तालुका चिटणीस किरण पाटील, प्रदीप पाटील, पदमसिंग परदेशी, हेमंत चव्हाण, जगदीश पाटील, योगेश ठाकूर, लकी पाटील, विरेंद्र चौधरी, जगदीश पाटील, मनोज पाटील, शुभम पाटील, रवींद्र देशमुख, संजय आढाव, सारंग पवार, विजय पाटील, रवींद्र पाटील, प्रकाश पाटील,दीपक, प्रवीण पाटील, भरत जिभाऊ सईद मिस्तरी, जगदीश राठोड, राजु देवरे, हेमंत पाटील सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलना प्रसंगी पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, दत्तात्रय नलावडे, विकास पाटील, पोलिस काॅन्स्टेबल प्रकाश पाटील, योगेश पाटील, नितीन सुर्यवंशी, सुनिल पाटील, सचिन पाटील, अमृत पाटील, मनोज माळी, विश्वास देशमुख, निलेश गायकवाड, ट्राफीकचे ए. एस. आय. प्रकाश पाटील, सुनिल पाटील, ट्राफीक काॅन्स्टेबल बापु महाजन, नंदकुमार जगताप, विजय पाटील, नगर पालिकेचे कर्मचारी अनिल वाघ, प्रशांत  कंडारे, प्रकाश लहासे सह होमगार्डच्या पथकाने बंदोबस्त ठेवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.