Wednesday, August 17, 2022

पाचोरा शहरात संवेदनशील भागात रॅपिड ऍक्शन फोर्स व पोलिस स्टेशन स्टाफ यांचा रूट मार्च

- Advertisement -

पाचोरा | प्रतिनिधी

- Advertisement -

दि. ३० रोजी सकाळी १० वाजता पाचोरा पोलिस स्टेशन हद्दीतील संवेदनशील भागातून रॅपिड ऍक्शन फोर्स व पाचोरा पोलिस स्टेशन स्टॉफ तर्फे रूट मार्च काढण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, व रॅपिड ऍक्शन फोर्स कमाडों रवी शेखावत यांचे उपस्थितीत घेण्यात आला. सदर रुट मार्च पाचोरा पोलिस स्टेशन येथून सुरू होऊन शहरातील नगरपालिका, हुसैनी चौक, मच्छी बाजार, आठवडे बाजार, रथ गल्ली, मुल्ला वाडा, छत्रपती शिवाजी महाराज चौक व शेवटी पोलिस स्टेशन पर्यंत सदरच्या रॅपिड एक्शन फोर्सचा रुट होता. सदर रूट मार्च मध्ये रॅपिड ऍक्शन फोर्सचे एक पोलिस निरीक्षक,  पाचोरा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक दत्तात्रय नलवडे, गणेश चौबे सह एकूण ५० कर्मचारी तसेच यांचा सहभाग होता.

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या