पाचोरा – दि. २१ रोजी महाशिवरात्री निमित्त शहरातील विविध महादेव मंदिरात हजारो भाविकांनी सकाळ पासुनच लाईन लावुन दर्शन घेतले. शहरातील विविध भागात युवकांनी भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केली होती.
महाशिवरात्री निमित्त भडगांव रोडवरील विवेकानंद नगरमधील श्री. सिध्देश्वर महादेव मंदिर, पांचाळेश्वर महादेव मंदिर, कोंडवाडा गल्ली, कैलादेवी माता मंदिरातील महादेव मंदिर, हेमांडपंथी महादेव मंदिर, जामनेर रोड, रामेश्वर महादेव मंदिर, शिवमंदिर, सिंधी काॅलनी येथे भाविकांनी सकाळ पासुनच मोठ्या रांगा लावुन महादेवाचे दर्शन घेतले. भडगाव रोडवरील सिध्देश्वर महादेव मंदिरात प्रलय राज गृप व मित्र परिवारासह अनेक ठिकाणी भाविकांसाठी आयोजकांनी साबुदाणा खिचडी, केळी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. महाशिवरात्री निमित्त संपूर्ण शहर हे भक्तिसागरात न्याहुन निघाले होते.