पाचोरा :- शहरातील चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे बंद असलेले सी.सी.टी.व्ही. कॅमरे लवकरात लवकर दुरुस्त करुन कार्यान्वित करावे या मागणी चे निवेदन न. पा. प्रशासन अधिकारी भोसले यांना देण्यात आले. यावेळी युवा नेते अमोल शिंदे, भाजप व्यापारी जिल्हा अध्यक्ष कांतिलाल जैन, बबलुशेठ संघवी, गणेश पाटे, राधेश्याम अग्रवाल, बंडू सिनकर, सुशील संघवी, गोपाल येवले, माधव सिनकर,अविनाश सिनकर व शहरातील उपस्थित सर्व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.