पाचोरा व भडगाव तालुक्यात भाजपा युवा मोर्चा वाॅरियर्सच्या शाखांचे उद्घाटन

0

पाचोरा | प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व भा.ज.यु.मो. चे महाराष्ट्र प्रभारी आणि राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भा.ज.पा. पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, अमोल पाटील (भडगाव), पाचोरा शहाराध्यक्ष रमेश वाणी, भा.ज.यु.मो. तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाच्या युवा वारीयर्स शाखांचे उदघाटन करण्यात आले. त्यामध्ये पाचोरा तालुक्यातील सामनेर, नांद्रा, कृष्णापुरी (पाचोरा), हनुमान नगर (पाचोरा), भास्कर नगर स्टॉप (पाचोरा), व भडगाव तालुक्यातील पारोळा चौफुली चौक भडगाव शहर व तांदुळवाडी या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामीण भागासह शहरांतील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहण्यास मिळाला त्यामुळे येणारा काळ हा युवापर्वाचाच असुन मोठ्या प्रमाणांत युवावर्ग हा भारतीय जनता पार्टी ला जुळतांना दिसत आहे.

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, योगेश मैंद, प्रदेश सचिव,  विजयजी बनछोडे, अनिकेत पाटील, हर्षल विभांडीक, प्रदेश सदस्य संकेत बावनकुळे, किरण बोराडे, अंकित संचेती, अमृत मारणे, जय नागर, विध्यार्थी प्रदेश संयोजक अक्षय पाटील, स्वप्नील काळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.