पाचोरा – वरखेडी दरम्यान दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक ;  एक जण जागीच ठार

0

पाचोरा ( प्रतिनिधी) : पाचोरा ते वरखेडी दरम्यान दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होवुन या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात अपघाताची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनिल पाटील हे तपास करीत आहे.

दि. २६ रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास वरखेडी दरम्यान जय गुरुदेव इंडस्ट्रीज वेअर हाऊस जवळ वरखेडी कडुन पाचोरा कडे येणारी मोटरसायकलला (क्रं. एम. एच. बी. सी. ४८८६) पाचोऱ्या कडुन वरखेडी कडे भरधाव वेगात जाणारी हिरो डिलक्स मोटरसायकलने (क्रं. एम. एच. २० ई. यु. ९२२९) जोरदार धडक दिली. यात जिवलाल सुकदेव आढारे (वय – ५४) रा. कायखेडा ता. जामनेर यांचा जागीच मृत्यू झाला. तर बबलु पुंडलिक माळे (वय – ३८) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी बबलु पुंडलिक माळे यांचे फिर्यादीवरून मोटरसायकल चालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनिल पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.