Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पाचोरा रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ साधेपणाने
    जळगाव

    पाचोरा रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ साधेपणाने

    By July 20, 2020No Comments68 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा (प्रतिनिधी) : येथे रोटरी क्लब ऑफ पाचोरा – भडगाव चा पदग्रहण समारंभ नुकताच अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. सन २० – २१ या वर्षासाठी पाचोरा – भडगाव रोटरी क्लब अध्यक्षपदी रो. डॉ. प्रशांत पाटील तर सेक्रेटरी पदी रो .डॉ. अमोल जाधव यांची निवड होऊन त्यांना पदभार सोपवण्यात आला. कोविड – १९ संसर्गाच्या पार्श्वभुमीवर अत्यंत मोजक्याच रोटरी सदस्यांच्या उपस्थितीत परंतु अत्यंत उत्साहात हा पदग्रहण समारंभ संपन्न झाला.
    शक्ती धाम, भडगाव रोड, पाचोरा येथे संपन्न या पदग्रहण समारंभाच्या प्रारंभी भारतीय सिमेवरील शहीद, कोरोना आजारातील मृतात्मे, तसेच रोटरी परिवारातील मृतात्म्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रोटरी क्लब पाचोरा – भडगाव चे मावळते अध्यक्ष रो. डॉ. भुषण मगर यांनी मागील वर्षातील आपल्या कार्यकाळातील विशेष उल्लेखनीय उपक्रम, पुरस्कार व रोटरी चळवळीतील आपल्या क्लबचे योगदान याबद्दल अहवाल सादर केला. मावळते सचिव डॉ. बाळकृष्ण पाटील यांचे तर्फे रो. रोहन पाटील यांनी मागील कार्यकाळातील क्लबचा लेखाजोखा सादर केला .
    पाचोरा – भडगाव रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष रो. डॉ. भुषण मगर पाटील यांनी नवनियुक्त अध्यक्ष रो. डॉ. प्रशांत पाटील यांना अध्यक्षपदाची कॉलर व चार्टर प्रदान केला. तर मावळते सचिव यांच्या वतीने रो. रोहन पाटील यांनी या वर्षाचे नुतन सचिव रो. डॉ. अमोल जाधव यांना सेक्रेटरी पदाची पीन प्रदान केली.
    नूतन अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी पदभार स्विकारल्यानंतर आगामी वर्षाचा संकल्प जाहीर करणारे मुद्देसूद मनोगत व्यक्त केले. यानंतर रोटरी क्लब मध्ये नव्याने सहभागी झालेल्या सदस्यांचे रोटरी पिन देऊन स्वागत करण्यात आले. त्यात प्रामुख्याने डॉ. मुकेश तेली , डॉ. निळकंठ पाटील, डॉ. सचिन पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. निखील जैन आदींचा समावेश होता. यावेळी रोटरीचे प्रांतपाल रो. शब्बीर शकिर, उपप्रांतपाल रो. योगेश भोळे यांनी झुम च्या माध्यमातुन शुभेच्छा संदेश दिला.
    या कार्यक्रमाला शक्तीधाम चे संचालक रो. रमेश मोर, रो.डॉ. योगेंद्रसिंह मोरे, रो. प्रदीप पाटील, रो. सुयोग जैन, रो. रुपेश शिंदे, रो. डॉ. पवन पाटील, रो. राजेश मोर, रो. निलेश कोटेचा, रो. अतुल शिरसमणे, रो. डॉ. घनश्याम तेली, रो. डॉ. गोरख महाजन, रो. डॉ. दिनेश सोनार, रो. शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. क्लबचे सिनियर रोटेरियन डॉ. जवाहर संघवी, रो. चंद्रकांत लोढाया, रो. पुरुषोत्तम अग्रवाल व रो. भरत सिनकर यांनी झुम ॲपच्या माध्यमातुन पदग्रहण समारंभाला शुभेच्छा दिल्या.

    रो. शैलेश खंडेलवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. रो. राजेश मोर यांनी प्रास्ताविक केले. नुतन सचिव रो. डॉ. अमोल जाधव यांनी आभार मानले. रोटरी क्लब पाचोरा – भडगाव व झोनमधील अन्य सहयोगी रोटरी क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी झुम ॲपच्या माध्यमातुन कार्यक्रमाला उपस्थिती दिली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif