पाचोरा :- पाचोरा येथील भडगांव रोडवरील कैलामाता मंदिराच्या वार्षीक उत्सवास दि. १० मे शुक्रवार पासून सुरवात होत आहे. सालाबादप्रमाणे उत्साह साजरा करण्यात येत असल्याने हे २५ वे वर्षे आहे. या निमित्ताने तीन दिवस रात्री ८:०० वाजता कैलादेवी भगवतीचे जागरण व भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या जागरणासाठी इंदौर येथून प्रसिद्ध भजन मंडळाला पाचारण करण्यात आले आहे. उत्सवाची सांगता रविवारी दिनांक १२ रोजी असुन या दिवशी सकाळी ११:३० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
पाचोरा येथील उद्योगपती पुरशोत्तम अग्रवाल यांनी भडगांव रोडवर कैला मातेचे भव्य मंदिर उभारले असून जळगांव जिल्ह्यातील जळगाव येथील व्यंकटेश मंदिरा नंतर पाचोरा येथील कैला देवीच्या मंदिराचा पाया महाराष्ट्रातील कारागीरांनी तर मंदिराचे बांधकाम राज्यस्थानी कारागीरांनी बांधला आहे. मध्यप्रदेशातील सिमेलगत वाहणाऱ्या चंबळ नदि पासून ३० किलोमीटर अंतरावर सवाई माधोपूरा या गावी येथे कैला मातेचे मंदिर उत्तर भारताच्या शक्तिपीठांपैकी एक जागृत मंदिर आहे. याच मंदिराची प्रतिकृती पाचोरा येथे साकारण्यात आली आहे. मंदिराचे देखभाल मुख्य पुजारी जगदिश अग्रवाल, अक्षय पंडित (डोंगरे), ओमप्रकाश (मध्यप्रदेश) हे काम पाहतात.