पाचोरा :- येथील भडगांव रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात नगरपरीषदे तर्फे संभाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. येथील संभाजी महाराजांच्या प्रतीमेचा अनावरण सोहळा आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल,युवा नेते अमोल शिंदे, डॉ भुषण मगर, उद्योजक मुकुंद बिल्दिकर पोलीस निरीक्षक अनिल शिंदे सह सनभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतीमेचे पुजन करून छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी केली, सकाळी सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कष्णापूरी ते संभाजी चौकापर्यंत मोटारसायकल रॅली काढली होती,तर सायंकाळी विविध वेशभूषा करून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी प्रा गणेश पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, राहुल बोरसे, नगरसेवक बापू हाटकर, वाल्मीक पाटील, आनंद पगारे, संगिता पगारे, आशा हाटकर, लता पाटील, उर्मीला शेळके, संभाजी ब्रिगेडचे जिभाऊ हाटकर, मुकेश तुपे, विकास पाटील, गणेश पाटील, रवि देवरे, सुरेश दळवी, दिपक पाटील, सुनील पाटील, भुषण देशमुख, किरण पाटील, राजेंद्र पाटील, रविंद्र पाटील, अँड राजेंद्र परदेशी, ऊद्धव मराठे, स्विय सहाय्यक राजेंद्र पाटील सह मोठ्या संख्येने उपस्थित होते.