संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे रक्तदान जनजागृती प्रभातफेरी
पाचोरा(प्रतिनिधी)- येथे रसंत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे रक्तदान जनजागृती प्रभातफेरी काढण्यात येऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी २०० हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले .
यामध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे पाचोरा येथील स्वयंसेवक, सेवादल, उपस्थित होते. शहरातील कृष्णापुरी ,देशमुख वाडी नगरपालिका चौक ,रेल्वे स्टेशन रोड ,शिवाजी महाराज चौक ,जामनेर रोड या विविध ठिकाणी जाऊन रक्तदान शिबिराबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी महेश वाघ यांनी सांगितले की संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन च्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे संत निरंकारी मिशन च्या माध्यमातून पहिले रक्तदान शिबीर नोव्हेंबर १९८६ साली दिल्ली मध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्धघाटनाप्रसंगी संत निरंकारी मिशन चे तत्कालीन सदगुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी स्वतः रक्तदान केले होते. त्यावेळेस ते म्हणाले होते, रक्त नाल्यांमध्ये न वाहता ते नाड्यांमध्ये वाहावे.याच घोषवाक्याचे आधार घेऊन संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन शाखा पाचोरा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शहरातील २०० हून अधिक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले. यावेळी पाचोरा भडगाव मतदार संघातील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील ,नगराध्यक्ष संजय गोहिल उपनगराध्यक्ष शरद पाटील, नगरसेवक बाबू हटकर ,नगरसेवक सतीश चेडे, माजी नगरसेवक गंगाराम पाटील ,वैद्यकीय अधिकारी डॉ मंदार करंबेळकर निरंकारी मंडळाचे विभाग प्रवर्तक हिलाल खैरनार तालुका मुखी महेश वाघ किशनचंद यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते .
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post