पाचोरा :- येथील सेवानिवृत्त कर्मचार्याला गंडवून पोबारा केलेल्या आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. याबाबत वृत्त असे की, दि. १ रोजी शहरात दुपारच्या वेळेस नामे चिंधा दौलत मोरे वय ७० रिटायर रेल्वे कर्मचारी राहणार गाडगेबाबा नगर पाचोरा हे त्यांच्या सेवानिवृत्तीची पेन्शन रुपये १५ हजार रुपये घेऊन घरी जात होते.
यावेळी एकाने नातेवाईक सांगून त्यांच्याकडी पंधरा हजार रुपये रक्कम घेऊन पलायन केले होते. दरम्यान या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २५५/२०१९ कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील प्रताप पाटील, राहुल सोनवणे, विनोद बेलदार व दीपक सुरवाडे यांनी तपासाची चक्रे फिरवली. सीसीटिव्हीच्या फुटेजमध्ये संबंधीत व्यक्ती हा दिगंबर कौतिक मानकर ( रा. आसोदा रोड जळगाव) असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्याला तातडीने अटक करण्यात आली आहे.



