पाचोरा :- पाचोरा येथे ट्रॅक्टर चालकासह दोघांनी डिझेलची चोरी केल्याने वाहन मालकाने दोघांविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. येथील गोकुळ काशिनाथ गाडेकर यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम. एच.१९- बी. जी. १०७० ह्या ट्रॅक्टरमधून दिनांक ४ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान वाहन चालक अनिल गायकवाड रा. जुवार्डी ता. भडगांव व त्याचा साथीदार योगेश सुभाष साळुंखे रा. वाकडी ता. सोयगांव यांनी २ हजार ३८० रुपये किंमतीचे ३५ लिटर डिझेलची चोरी केली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गोकुळ गाडेकर यांनी फिर्याद दिली. घटनेचा तपास सहायक फौजदार जितेंद्र तायडे हे करीत आहेत.