पाचोरा येथे राज्य स्तरीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात !

0

–  मानवी संहार थांबवायचा असेल तर भाषेचा संहार थांबविणे काळाची गरज – संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. किसन पाटील

– साहित्य संमेलनाने पाचोरा शहर रसिकांनी फुलले

पाचोरा (प्रतिनिधी) :  आईच्या उदरातून बाळाचा जन्म झाल्या नंतर जी नाळ तोडली जाते तीला माय बोली म्हटले जाते. इंग्रजी माध्यमाचे आक्रमणं मराठी भाषेवर होत आहे त्याला कारणीभूत आपले राज्य कर्तेच असून तात्कालिक शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मराठी माध्यमाच्या १५ हजार शाळा बंद करुन इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दालन खुले करून दिले आहे. या साहित्य संमेलनाचे निमित्ताने आम्ही त्यांच्या निर्णयाचा निषेध करीत आहेत. मानुष मातृभाषेतून शिकतो हे मुल तत्व आहे आईवडील वेगळे सांगतात तर चार हजार पगारावाली बाई वेगळ सांगते. यामुळे पिढीत अंतर पडू लागले आहे. यामुळे बोली भाषा व प्रमाण भाषेत संभ्रम निर्माण होत आहे. एक बोली मारणे म्हणजे एक संस्कृती नष्ट करणे आहे, यामुळे प्रमाण भाषेचा अहम गंड सर्वात वाईट गोष्ट आहे. बोलीलील नुनगंड थांबत नाही तो पर्यंत भाषिक सांस्कृतीक वातावरण निर्माण होणार नाही,त्रिभाषा सुत्रच भारतीय संस्कृतीला जपू शकते. आईच्या बोलीतून आलेल्य भाषेचा चिंतनातून मधला मार्ग काढला गेला पाहिजे असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. किसन पाटील यांनी मांडले. यावेळी त्यांनी मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करावे, लोककला व लोक संस्कृती जतन करण्यासाठी स्वतंत्र विद्या पिठाची निर्मीती करावी. विविध जळवळीला अखील भारतीय स्तरावर स्थान द्यावे अशा तीन मागण्याही त्यांनी साहित्य संमेलनाचे माध्यमातून केल्या.

पाचोरा येथील श्री. मुरलीधरजी मांनशिंगका महाविद्यालयात महाराष्ट्र साहित्य परीषेदे पूणे शाखा पाचोरा आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई द्वारे राज्य स्थरीय मराठी बोली साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व बोलीचे अभ्यासक डॉ. प्राचार्य किसन पाटील होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ तर ग्रंथ पुजन पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून शाहदा येथील जेष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, विजय देशपांडे, माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणे, लखनसींह कटारे, प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, भडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन एन गायकवाड, महाराष्ट्र बोली साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. हरीषचंद्र  बोरकर, डॉ. अशोक कोळी, सुनिल गायकवाड पी. टी. सी.चे मानद सचिव अॅड. महेश देशमुख, पाचोरा शाखेचे अध्यक्ष डॉ. वासुदेव वले, अजय अहिरे सर, व्यासपीठावर उपस्थित होते. साहित्य संमेलनाचे आदल्या दिवशी दिनांक २३ रोजी रात्री’ चला हवा येऊ द्या’ फेम सुप्रसिध्द विनोदी कवी किशोर बळी यांचा हास्यबळी डॉट कॉम हा विनोदी कार्यक्रम झाला.

साहित्य संमेलनात मार्गदर्शन करतांना शाहादा येथील जेष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे यांनी सांगितले की, बोली सातत्याने जीवन जपले असून बोली साहीत्यातून संस्कृती जपली जाते, यामुळे जीवनाला महत्व प्राप्त झाले आहे. समाजाने अनेक जाती जमातीच्या महत्व जाणून घेतले पाहिजे. बोली भाषा नष्ट झाली तर जीवन व संस्नकृती नष्ट होईल. अनेक भाषा काळाच्या पडद्याआड जात असून या भाषांचा आदर्श जपला पाहिजे. वरचष्मा वाद्यांनी भाषेवर आक्रमण करणे थांबविले पाहिजे नहीतर अनेक बोलीभाषा व संस्कृती धोक्यात येईल.

साहित्य संमेलनात डॉ शशिकांत साळुंखे “अहिराणी बोली”, डॉ. जतीन मेढे “लेवा पाटीदार बोली,” डॉ संजीवकुमार सोनवणे.

“दलीत साहित्यातील बोली, देविदास पवार “झाली बोली,” व अनेक स्थानिक साहित्यकांनी विविध बोली भाषेतील साहित्य सादर करून रसिकांची मने जिंकली.

संमेलनात प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील यांची सुकन्या कै. किर्ती भिमराव पाटील यांचे स्मरणार्थ कवी प्रभाकर शेळके लिखीत “ढासाळल्या भिंती” या कविता संग्रहास एक रुपये रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. अरुण जोशी यांच्या ” एक एक घर कवितेचे ” किशोर कुमावत यांच्या अर्च्या या काव्य संग्रहाचे देवा पाटील यांचे “उम्रा “या काव्य संग्राहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खानदेशातील साहित्यिक विनायक पाटील, व रा. स. साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्राच्या यशस्वितेसाठी प्रा. वासुदेव वले, प्रा. राजेश मांडोळे, प्रा. श्रावण तडवी, प्रा. कमलाकर इंगळे, उपप्राचार्य एस. एम. पाटील, डॉ. जे. व्ही. पाटील, अजय अहिरे, डी. जी. कुमावत, हेमलता पाटील, चंद्रकला गायकवाड, सुनिता मांडोळे,  यांनी सहकार्य केले.

सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निर्मल इंटरनॅशनल स्कुल, श्री. गो. से. हायस्कूल, पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयात, जय किरण प्रभाजी इंग्लिश मेडियम स्कुल, गुरुकुल इंग्लीश मेडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विविध पोषाक परीधान करून महाविद्यालया पर्यंत रॅली काढली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जतीन मेढे प्रास्थाविक डॉ. बी. एन. पाटील, तर आभार डॉ. वासुदेव वले यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.