पाचोरा येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ११ जणांची निवड

0

कांताई नेत्रालय हॉस्पिटल जळगाव येथे रुग्ण रवाना
पाचोरा (प्रतिनिधी) – आमदार किशोर पाटील तथा पुणे अंधजन मंडळ व भंवरलाल व कांताबाई जैन च्यारीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या २ तारखेला शिवसेना कार्यालय पाचोरा येथे तर दर महिन्याच्या १ तारखेला भडगाव येथे मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांची निवड केली जाते. दि.०२ रोजी पाचोरा तालुक्यातील ३४ रुग्णांची तपासणी झाली व  ११ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झाली त्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी कांताई नेत्रालय हॉस्पिटल जळगाव येथे रवाना करण्यात आले.

शिवसेना वर्धापनदिनाच्या निमित्ताने मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने समाजातील सर्व थरातील गोरगरीब आजी आजोबा अतिशय आनंदित झाले आहे. ते स्वतःची कामे स्वतः करीत आहे. त्यामुळे ते आमदार किशोर  पाटील यांच्या सेवेचे कौतुक करीत आहे.

तसेच या मोतीबिंदू शिबाराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ. किशोर पाटील यांनी केले आहे.म्हणून ह्या सेवेचा पाचोरा – भडगाव तालुक्यातील मोतीबिंदू पिडीतानी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे. यावेळी मा. आमदार आर.ओ.पाटील, हिलाल पाटील शिंदाड, पप्पू राजपूत, बापू हटकर, फहीम शेख, खंडू सोनवणे,सुधाकर महाजन, आनंद पगारे,संदीपराजे पाटील, स्वामी पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते. याकरिता चिकित्सक संतोष पवार, प्रमोद महाजन, युवराज देसरडा मोतीबिंदू विभाग प्रमुख, जळगाव, दिपक पाटील जारगाव, विजय भोई यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.