पाचोरा (प्रतिनिधी) – महाराणा प्रताप यांची ४७८ वी जयंती निमित्ताने महाराणा प्रताप चौकात राजे प्रतिष्ठान पाचोरा यांच्यातर्फे पुजन व हार-माल्यार्पण सोहळा आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी राजे प्रतिष्ठान चे अध्यक्ष पप्पु राजपुत यांच्याकडुण महाराणा प्रताप यांचा भव्य असा देखावा महाराणा प्रताप चौकात सादर केलेला होता.त्यात सर्व समाजाला समाजहिताचे महत्वपुर्ण असे सामाजिक संदेश देण्यात आले आहेत.त्यामध्ये वसुंधरा वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, मुलींना समजु नका भार मुलींच आहे जीवनाचा खरा भार, पाणी अडवा पाणी जीरवा, पढे चलो बढे चलो, बाल मजुरी हटवुया बाल मजुरी मिटवुया, निरोगी आयुष्याची गुरूकिल्ली, लाखांचा पोशींदा जगलाच पाहिजे, तंबाखु जन्य पदार्थांचे दुष्परीणाम, झाडांचे संवर्धन करा हे संदेश देखावेसह दाखवण्यात आलेले होते.
यावेळी उपनगराध्यक्ष शरद पाटे,नगरसेवक शितल सोमवंशी,गंगाराम पाटील,आनंद पगारे,मनोज चौधरी,उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील,तालुकाप्रमुख शरद पाटील,शहरप्रमुख किशोर बारवकर,युवासेना शहरप्रमुख संदिप राजे,भारतीय मजदुर संघाचे पि. जे. पाटील,स्विय सहाय्यक राजु पाटील, अजयकुमार जयस्वाल,विजु पाटील,जितेंद्र पेंढारकर,सोमा पाटील,निलेश पाटील,दादा पाटील,दत्तु पाटील,दिलीप कासार,गणेश परदेशी,राजु परदेशी,प्रशांत पांढरे,मनोज पाटील,वैभव राजपुत,अमोल राजपुत,अनिल पाटील,चेतना पाटील,शुभम राजपुत,विजय राजपुत,दत्तु कुळकर्णी,भरतसिंग पाटील,पुरणसिंग पाटील,प्रा.व्हि आर पाटील,अनिल राठोड,बंटी चव्हाण,पवार सर,ठाकुर सर,सतीष पाटील सर,परेश पाटील व धुडकु पाटील आणि सुधीर पाटील हे सर्व उपस्थित होते.