पाचोरा येथे भाजपातर्फे मोटरसायकल रॅली

0

पाचोरा :- पाचोरा येथे दि.३ रोजी दुपारी १२ वाजता भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुका व शहर मंडळाकडून विजयी संकल्प मोटर सायकल रैली काढण्यात आली. ही रॅली भडगाव रोड वरील महादेव मंदिर येथुन निघाली. रॅलीस आमदार स्मिता वाघ यांनी झेंडा दाखवून रवाना केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जिल्हा सरचिटणीस सदाशिव आबा पाटील, विधानसभाक्षेत्र प्रमुख मधुभाऊ काटे, तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, शहराध्यक्ष नंदू बापू सोमवण्शी, राज्य परिषद सदस्य भाउसौ डी .एम .पाटील, कुउबा सभापती सतीश बापु शिंदे, तालुका सरचिटणीस प्रदीप बापु पाटील, मा.नगरसेवक अमोल भाऊ शिंदे, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, विस्तारक दीपक देशमुख, शहर सरचिटणीस नितीन पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, भडगाव शहराध्यक्ष शैलेश पाटील, भडगांव ता. सरचिटणीस अनिल पाटील या पदाधिकाऱ्यासह शेकडो कार्यकर्ते या रैलीत सहभागी झाले होते. ही रैली भडगांव रोड येथून पाचोरा शहरात फिरली या वेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो अश्या विविध घोषणा देत पाचोरा शहर दणाणून सोडल. तसेच या रैलीचा समारोप जारगाव येथील नाथ मंदिर येथे करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.