पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा तालुका सह. शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल येथे आज दि. २३ मार्च रोजी शहीद दिन साजरा करण्यात आला. शहीद दिनानिमित्त थोरदेश भक्त क्रांतिकारक हुतात्मा शहीद भगतसिंग, सुकदेव व राजगुरू यांच्या पवित्र प्रतिमेस माल्यार्पण व प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला एम. वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. पाटील, ए. बी. अहिरे व कार्यालय प्रमुख अजय सिनकर सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.