पाचोरा येथील ॲड. दिनकर देवरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुळचे लासुरे ता. पाचोरा येथील रहिवासी असलेले ह. मु.  पाचोरा शहरातील संघवी कॉलनीतील रहिवासी तथा प्रशिध्द वकील ॲड. दिनकर माधवराव देवरे यांचे दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ॲड. देवरे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस गावच्या सरपंचापासून सुरवात केली होती.

त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्या नंतर शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांचेवर तालुका प्रमुख, उपजिल्हाप्रमुखाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याने त्यांची पाचोरा कृषी बाजार समितीचे सभापती पदी वर्णी लावण्यात आली होती. माजी आमदार कै. आर. ओ. (तात्या) पाटील व आमदार किशोर पाटील यांचे ते अतिशय विश्वासु पदाधिकारी होते, ॲड. दिनकर देवरे यांचे मृत्यू समयी (वय ६८) वर्षाचे होते.

त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुली, तीन भाऊ, एक बहीण असा परिवार असून त्यांचेवर शनिवारी सकाळी १० वाजता लासुरे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे निधनाने शिवसेनेला मोठी हानी झाली आहे. व पाचोरा शहर आणि लासूरे गावात मोठी शोककळा पसरली होती. ते जागृती विद्यालयाचे क्लार्क शरद माधवराव देवरे, आदर्श शेतकरी अंकुश व भरत देवरे यांचे बंधू होत.

Leave A Reply

Your email address will not be published.