पाचोरा (प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषदेच्या उपविभागीय अधिकारी पाणी पुरवठा कार्यालयातच पाण्याची नासांडी होत असल्याने “कुंपणच शेत खातयं” यासारखे चित्र सद्य स्थितीत बघावयास मिळत आहे.
एकीकडे केंद्र सरकार व राज्य सरकार “पाणी वाचवा, पाणी जिरवा” या मोहिमेत लाखो रुपये खर्च करुन जनजागृती करीत असतांनाच पाचोरा येथील जिल्हा परिषदेच्या उपविभागीय ग्रामिण पाणी पुरवठा कार्यालयात ऐन रविवारी म्हणजेच सुट्टीच्या दिवशी कार्यालयाच्या इमारतीवर बसविण्यात आलेल्या पाण्याची टाकी ही ओव्हर फ्लो होवुन हजारो लिटर पाणी जात असल्याचे पहावयास मिळाले आहे. रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस असल्याने या टाकीत पाणी केव्हा सोडण्यात आले? व ते कोणी सोडले याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
यावेळी कार्यालयाच्या परिसरात कोणता ही कर्मचारी आढळुन आला नसुन कार्यालय कुलुप बंद अवस्थेत आढळुन आले तर पाणी सोडले कोणी हा चर्चेचा विषय ठरत आहे.