पाचोरा – ३१ रोजी गुरुकुलच्या प्रांगणात आर्ट व क्राफ्ट (हस्तकला) प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटनटन माजी सैनिक रविंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. याप्रसंगी बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे संस्थापक हरिभाऊ पाटील, माजी स्वातंत्र्य सैनिक वसंतराव पाटील, गुरुकुलचे प्राचार्य प्रेमकुमार शामनाणी, डॉ. मनिष चंदनानी सह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत (रिबन) कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण केंद्र म्हणजे विविध हस्तकलाचे बनविलेले दालन – मुलांनी आपल्या कल्पना शक्तिनुसार निसर्ग आणि मणुष्य यांच्यातील नाती पाहण्याचे, जीवनातील महत्त्व, गृहशोभेच्या वस्तू अशा विविध हस्तकलांचे विविध प्रकारचे एकूण ४३८ प्रतिकृती याठिकाणी पाहण्यास मिळाले. भविष्यात देखील अशाच कलागुणांना वाव मिळावा म्हणून अशा प्रदर्शनाची नितांत गरज आहे. असे प्रतिपादन वसंतराव पाटील यांनी केले. शाळेचे प्राचार्य प्रेमकुमार शामनाणी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व आभार मानले. समस्त कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रदर्शन पाहण्यासाठी पालक व ग्रामस्थांची तुडुंब गर्दी होती. यावेळी इ.१ ली ते ७ वीच्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रात्याक्षिक सादर केले. तसेच इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेतून माहिती दिली. भेट देणाऱ्या पालकांनी सर्व विद्यार्थांचे कौतुक केले व प्रदर्शनी बद्दल प्रशंसनीय लेखी अभिप्राय दिले.