पाचोरा येथील कृष्णापुरी व पांचाळेश्वर पुलांच्या कामास सुरुवात

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातून वाहत जाणाऱ्या कृष्णापुरी भागातील हिवरा नदीवरील पुलाच्या व पांचाळेश्वर या दोन पुलांच्या  कामास आज सुरुवात करण्यात आली. शहराला जोडणाऱ्या या दोन्ही पुलाच्या बांधकामामुळे वाहन धारकांसह सर्वसामान्य नागरिकांना व स्थानिक राहिवाश्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान पालिकेने या पूर्वीच जाहीर सूचना प्रसिद्ध करत यामार्गावरील राहिदारी बंद केली आहे. तालुक्यासह जिल्ह्यात विविध  ठिकाणचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी व गुणवत्तापूर्वक पुर्ततेसाठी नाव लौकिक असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक एम. एस. पी. बिल्डकाँन या कंपनीने या कामाचे कंत्राट घेतले असून या कामाच्या माध्यमातून पाचोरा पालिकेत सत्ताधारी शिवसेनेने देखील वचनपूर्तीच्या दिशेने टाकलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे. कृष्णापुरी पुलाची एकूण चार फूट उंची वाढवली जाणार असून पाचोरा नगरपालिकेने आमदार किशोर पाटील यांचे माध्यमातून सतत पाठपुरावा करत यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे तर पंचाळेश्वर या तुलनेने मोठ्या असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.

या कामांच्या पुर्ततेची मुदत सुमारे वर्ष भराची आहे मात्र निसर्गाने साथ दिल्यास कृष्णापुरी पुलाचे काम दिवाळी पर्यंत पूर्ण करण्याचे आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्याचे कंत्राटदार मनोज पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले आहे. दरम्यान तिसरा ७ कोटी रुपायांचा पूल अर्थात स्मशानभूमीला जोडणाऱ्या पुलाचे देखील काम आगामी महिन्याभरात सुरू करण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. या तीनही पुलांच्या बांधकामामुळे शहर सौंदर्य करणार भर पडणार असून दळणवळण अधिक जलद होण्यास मदत मिळून नागरिकांना वर्षानुवर्षे होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळणार असल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू म्हटले आहे तर शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या शब्दाची यानिमित्ताने वचनपूर्तीचा आनंद होत असल्याची भावना नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी व्यक्त केली आहे.

पाचोरा व भडगाव शहरात विविध विकास कामे मंजुरीच्या टप्यात असून पाचोरा शहरातील गाव भागातील रस्ते कामांच्या ४४कोटी रुपयांच्या डी.पी.आर. ला तत्वतः मंजुरी मिळाली आहे. लवकरच या कामांना सुरुवात असून वचनपूर्तीचा शिवसेनेला आनंद आहे.

किशोर पाटील

आमदार- पाचोरा- भडगाव

Leave A Reply

Your email address will not be published.