पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयात रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान

0

पाचोरा  (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या परिवहन मंत्रालय व वाहतुक शाखेच्या वतीने दि. १८ जानेवारी २०२१ ते १७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान संपूर्ण जळगांव जिल्हयात विविध कार्यक्रमांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

 

राष्ट्रीय राज्यमार्ग वाहतूक व परिवहन मंत्रालय, स्थानिक वाहतुक शाखा, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून केवलाई फाऊंडेशन व  येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केवलाई फाऊंडेशनचे अध्यक्ष आबा पाटील हे होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. शरद पाटील, प्रा. डॉ. अतुल सुर्यवंशी, प्रा. महेश पाटील, प्रा. गिरीश पाटील, प्रा. सुनिल पाटील सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत मोटरसायकल चालविण्याबाबत घ्यावयाची दक्षता याविषयी मार्गदर्शन केले. व मोटरसायकल ला रिफ्लेक्टर लावण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.