पाचोरा :- येथील माध्यमिक व व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयात आज दिनांक २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. यावेळी प्रा. रवींद्र चव्हाण, प्रा. किसन भारुडे, प्रा. प्रतिमा परदेशी, प्रा. अंकिता देशमुख, संगीता राजपूत, प्रा. प्रतिभा पाटील, शिवाजी शिंदे, अंबालाल पवार, निवृत्ती बाविस्कर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.