पाचोरा-भडगाव नगरपरिषद हद्दीत 19 ते 21 मार्चपर्यंत निर्बंध ; काय बंद,काय सुरु राहणार?

0

पाचोरा प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाने कहर केले आहे. पाचोरा व भडगाव तालुक्यात ही कोरोनाने चांगलेच हातपाय पसरविण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाचोरा व भडगाव नगरपालिका हद्दीत १९ ते २१ मार्चदरम्यान असे तीन दिवस निर्बंध लागू करण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी आज काढले आहे

काय बंद काय सुरु?

– सर्व बाजारपेठ, आठवडी बाजार बंद राहतील.

-किराणा दुकाने इतर सर्व दुकाने बंद राहतील,

–  किरकोळ भाजीपाला, फळ खरेदी विक्री केंद्र बंद राहतील.

– शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय बंद राहतील.

–  सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतीक, धार्मीक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील.

– शॉपींग मॉल्स, मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलुन, लिकर शॉप बंद राहतील.

– गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव,  प्रेक्षणगृहे, क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील.

-पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीचे ठिकाणे बंद राहतील.

 

या व्यतिरिक्त दुध विक्री केंद्रे, वैद्यकीय उपचार, सेवा मेडीकल स्टोअर्स, ॲम्ब्युलन्स सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटना यांना सुट देण्यात आली आहे. तसचे २१ मार्च रोजी होणारे पुर्व नियोजित परिक्षा असल्याने परीक्षेच्या कालावधीत परिक्षार्थी व परिक्षेकरीत नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांना निर्बंधातून सुट राहणार आहे. दरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी काढले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.