पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा-भडगाव तालुक्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती मिळावी या करिताचा प्रस्ताव आमदार किशोर पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दाखल केलेला होता. रस्त्यांबाबत वारंवार बैठका ना.अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या दालनात संपन्न झाल्यात. रस्त्यांची दुर्दशा झाल्यामुळे होणारे नागरीकांचे हाल आमदार किशोर पाटील यांनी मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले. याबाबतीत मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा
ना.गुलाबराव पाटील यांच्या शिफारसीने तात्काळ ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची प्रमुख जिल्हा जिल्हामार्गत रूपांतर करण्याचा शासन निर्णय दि.१८/०२/२०२० रोजी पारित करण्यात आला.
पाचोरा तालुक्यातील ९०.७५ कि.मी रस्ते तर भडगाव तालुक्यातील ८२.३०० कि.मी रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्याने रस्ता दुरुस्ती व मजबुती करण्यासाठी निधी उपलब्ध होईल. भविष्यात रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ व गावांची संख्या, लोकसंख्या रस्त्यांचा होणारा वापर गांभीर्याने लक्षात घेऊन रस्त्यांचे निर्माण करण्यात येईल यासंबंधीचा शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे. यामुळे पाचोरा-भडगाव तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केलेला असून आमदार किशोर पाटील यांचे आभार देखील व्यक्त करीत आहे.