पाचोरा बाजार समितीत व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

0

पाचोरा | प्रतिनिधी
 जळगांव कृषी उत्पन्न बाजार समितीची विकासकाने संरक्षक भिंत पाडल्याने काही दिवसांपासून तेथील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. त्याला पाठींबा देण्यासाठी पाचोरा येथील व्यापारी असोसिएशनने बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरुडे यांना लेखी निवेदनाद्वारे कळवून दिनांक २४ रोजी एकदिवस कडकडीत बंद पाळला आहे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष भरत शेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सुभाष अग्रवाल, देवेंद्र कोटेजा, संजय सिसोदिया, भुषण बोथरा, प्रतीक मोर, धिरज बांठिया, महेंद्र  पाटे मोचंदूलाअग्रवाल, किशोर बांठीया  यांचेसह ७० व्यापाऱ्यांनी दिवसभर लिलावाचे कामकाज बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. यामुळे बाजार समितीचे लाखो रुपयाचे नुकसान झाले तर त्यावर विसंबून असलेल्या १०० हमालांचा रोजगार बुडाल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष इसुफ गुलाब शाह यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.