पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यात पाचोरा पोलीस ठाण्यासह नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन माध्यमिक विद्यालय कुरंगी, सामनेर ग्रामपंचायत कार्यालय, वाणेगाव ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र नांद्रा संविधान दिवस मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुण सर्वांनी संविधानाची प्रातिज्ञा घेतली. यावेळी पोलिस निरीक्षक अनिल शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय नलावडे, गणेश चोभे, प्रकाश पाटील, किरण पाटील, श्याम पाटील, राहुल सोनवणे, राहुल बेहरे यशवंत घोरसे, नितिन सूर्यवंशी, व महिला पोलीस कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ, वैष्णवी पाटील, डाॅ. ज्ञानेश्वर सय्यांसे, आरोग्य सहाय्यक राजेंद्र महाजन ,लॅब टेक्नेशीयन सुधीर सोनकुळ, आरोग्य सेवक महेंद्र वानखेडे, जी.पी, लोखंडे, कैलास सिरसाठ, ज्ञानेश्वर चव्हाण, प्राविण रायगडे, गट प्रवर्तक योगिता वाणी, संगिता परादेशी, आरोग्य सेविका माया सोनवणे, अक्का वाघ, औषध निर्माण अधिकारी सुरेश वाघ, आरोग्य सेविका एम.बी. चौधरी यांच्या सह कर्मचारी व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.