पाचोरा पं.स.च्या सभापतीपदी वसंत गायकवाड तर उपसभापतीपदी रत्नप्रभा पाटील बिनविरोध

0

पाचोरा पंचायत समितीत पुन्हा भाजपाचा झेंडा

पाचोरा (प्रतिनिधी) :  पाचोरा पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अनुसूचित जमाती साठी राखीव असल्याने भाजपाच्या एकमेव सदस्य असलेल्या वसंत हरीचंद गायकवाड (भोरटेक) तर उपसभापती पदासाठी रत्नप्रभा अशोक पाटील (पिंपळगाव हरे.) यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सभापती, उपसभापती पदाची निवडणूक तहसिलदार कैलास चावडे यांनी बिनविरोध घोषित केले. त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक पी. एम. टेकाडे यांनी सहकार्य केले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य सुभाष पाटील, सभापती बन्सीलाल पाटील, सदस्य ललीत वाघ, उपसभापती अनिता पवार, अनिता कैलास चौधरी, रेखा पितांबर पाटील, मंगला शिद्दार्थ पवार, वसंत गायकवाड असे दहाही सदस्य उपस्थित होते.

पाचोरा पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अनुसूचित जमातीच्या वसंत गायकवाड यांना सुभाष पाटील यांनी सुचक म्हणून तर दहा महिन्यासाठी अनिता कैलास चौधरी व रत्नप्रभा अशोक पाटील यांच्यात सहमती झाल्याने रत्नप्रभा अशोक पाटील यांना प्रथम संधी देण्यात आली. रत्नप्रभा अशोक पाटील यांना सुचक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते ललीत वाघ यांनी सही केली. सभापती बन्सीलाल पाटील व माजी सभापती तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, ललीत वाघ यांनी अनिता कैलास चौधरी यांचे मनधरणी केली. सभापती उपसभापती निवड घोषित झाल्यानंतर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, युवा नेते अमोल शिंदे, सुभाष पाटील, बन्सीलाल पाटील, प्रदिप पाटील, नंदु सोमवंशी, दत्ता बोरसे, सतीष शिंदे, सह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

  पाचोरा पंचायत समितीत पक्ष बलाबल

भारतीय जनता पार्टी.       – ०५

राष्ट्रवादी काँग्रेस.              – ०३

शिवसेना.                        – ०१

राष्ट्रीय काँग्रेस.                 – ०१

एकुण सदस्य                    – १०

Leave A Reply

Your email address will not be published.