पाचोरा तालुक्यात भाजपाचे घंटानाद आंदोलन

0

पाचोरा(प्रतिनिधी)  पाचोरा शहर व तालुक्यात मंदिर व देवस्थाने भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात यावीत असे विविध धार्मिक संघटनांसह भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण यांच्या वतीने ठिक -ठिकाणी मंदिरांच्या बाहेर घंटा तसेच टाळ वाजुन घंटानाद आंदोलन करण्यात आले.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मॉल्स, वाईन शॉप सारखी दुकाने पुन्हा सुरू केली. तसेच इतर सर्व काही चालू केले मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात देवाला मात्र बंदिस्त ठेवले आहे. असे यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले. तसेच केंद्र सरकारने यासंदर्भात नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार देशभरात बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू झालेले असून राज्यातही सामाजिक नंतर पाळुन आवश्यक नियम व अटी शर्तींनी देवस्थाने व  धार्मिक स्थळे सुरू करून भजन किर्तन व पूजन करण्यासाठी परवानगी मिळण्याची आग्रही मागणीचे निदेवन प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी शहरातील महादेव मंदिर भडगाव रोड, हनुमान मंदिर कृष्णापुरी, पंचमुखी हनुमान मंदिर, महादेव मंदिर शिवाजी चौक, हनुमान मंदिर आठवडे बाजार, राधा – स्वामी मंदिर सिंधी कॉलनी, हनुमान मंदिर जामनेर रोड तसेच ग्रामीण भागात पिंपळगाव (हरेश्वर), नगरदेवळा, पिंप्री, शिंदाड, वडगाव, सार्वे, बांबरुड या गावांमध्ये यावेळी घंटानाद आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, शहराध्यक्ष रमेश वाणी, तालुका सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील, दिपक माने, समाधान पाटील, हिम्मत पाटील, किशोर संचेती, सुनिल पाटील, विनोद पाटील, रविंद्र पाटील, नितीन पाटील, पुणेकर, योगेश ठाकूर, अनिल शिंदे, विरेंद्र चौधरी, रमेश शामनानी, गुलाब पंजवाणी, हेमंत पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.