पाचोरा तालुक्यात खरीप हंगामापूर्वीच्या मशागतीला वेग

0

बागायत कापूस लागवडीच्या शेत्रात कमालीची घट

पाचोरा :- खरीप हंगाम जसजसा जवळ येवू लागला आहे तसतसा हंगामापूर्वीच्या मशागतीला वेग येवू लागला असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस काही दिवस उशिरा येणार असला तरी शेतकऱ्यांनी शेताची नांगरणी करून पऱ्हाट्या काढण्या पासून कापूस लागवडीसाठी ठिबकसिंचणच्या नळ्या पसरविण्या पर्यंतची तयारी सुरू केली आहे. या वर्षी विहीरीहि कोरड्याठाक पडलेल्या असल्याने ठिबक सिंचनावरील कापूस लागवडीत कमालीची घट होवून ती केवळ ५ टक्या पर्यंत येणार आहे. लवकर कपासाची लागवड झाल्यास कापूस पिकावर गुलाबी बोंड अळी सह विवीध रोग येवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने कृषी विभागाने एक जून नंतरच कापसाचे बियाणे दिले जाणार आहे.

पाचोरा तालुक्यात शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापूस पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, तालुक्याच्या ८२ हजार ७०७ हेक्टर एकुण शेत्रफळापैकी लागवडीस उपयुक्त असलेल्या खरीप हंगामातील ५२ हजार ९६६ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ३२ ते ३५ हजार  हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते यात जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्रावर १५ मे पासून ठिबक सिंचनावर कापसाची लागवड केली जाते मात्र या वर्षी कोणत्याही प्रकल्पात, नद्या, नाले, व विहिरींना पाणी नसल्याने व पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर भरण्यासाठी ही पाणी नसल्याने गिरणा नदी थडी जवळील लोहटार, अंत्तुर्ली, बांबंरुड (महादेवाचे) पुणगांव, मांडकी, अंतुर्ली नं. ३, ओझर, भातखंडे, परघाडे, दुसखेडा,  हिवरा थडी काढा जवळील खडकदेवळा बु” खडकदेवळा खु”, वाघूलखेडा, सारोळा बु”, सारोळा खु”, जारगाव, चिंचखेडा, वगळता कोणत्याही गावातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच असूनही उन्हाळी कापसाची लागवड करता आली नाही. यामुळे सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांना भरघोस पाऊस पडल्या शिवाय कापसाची लागवड करता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.