पाचोरा (प्रतिनिधी) : तालुका पुरवठा विभागा अंतर्गत येणारे सर्व विषयांबाबत दि. २ रोजी पाचोरा येथील पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन अजिंक्य आंधळे यांचे सोबत सविस्तर चर्चा करून नागरिकांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते त्या अडचणी तातडीने सोडवण्याबाबतची सुचना यावेळी शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांनी केली. या बैठकीत तालुका अध्यक्ष शरद पाटील, युवासेना जिल्हा संघटक पप्पु राजपुत उपस्थित होते.
तालुका पुरवठा विभागाशी निगडीत पंतप्रधान मोफत अन्नसुरक्षा योजनेत नवीन लाभार्थींचे नाव समाविष्ट करणे, वंचीत जे समाज बांधव आहेत व आर्थिक दुर्बल घटक आहेत जे बाहेरगावाहुन आलेले आहेत पण त्यांचेकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत म्हणुन रेशनकार्ड नाही, रेशनकार्ड नाही तर पंतप्रधान मोफत अन्नसुरक्षा यादीत नाव नाही असे वंचीत नागरीकांना सुध्दा अन्न उपल्बध करता येईल का ? यासाठी त्यांची पण यादी मागवुन न्याय देण्याचा प्रयत्न करावा, नवीन रेशनकार्ड उपल्बध करून देणे, रेशनकार्डात नाव कमी करणे – किंवा वाढीव नाव समाविष्ट यापुढे फक्त एका दिवसात करून देणे, फाटलेले रेशनकार्ड बदलुन किंवा इतर दुरूस्ती तातडीने करून देणे, मागील ३ महिन्यांत तालुक्यात वाटप करण्यात आलेले रेशन धान्यांची शिल्लक व वाटप माहिती घेण्यात आली असता तालुक्यातील सर्व नागरीकांपर्यंत पुरवठा विभागाच्या निगरानी खाली पारदर्शकपणे व सुरळीतपणे स्वस्त धान्य दुकानदार मार्फत अन्नधान्य पोहचवण्यात आले असल्याचे कर्तव्यदक्ष पुरवठा अधिकारी अजिंक्य आंधळे यांनी बैठकीत दिली. यासंदर्भात सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली.
ज्या नागरीकांचे खरोखर वंचीत असुन पंतप्रधान मोफत अन्नसुरक्षा योजनेत नाव समाविष्ट नाही, ज्यांचे रेशनकार्ड नाही आणि ज्यांचे रेशनकार्ड असुन देखील फाटलेले, दुरूस्ती, नाव वाढविणे किंवा नाव कमी करायचे असतील अशा सर्वांनी आपले ओरीजनल जुने रेशनकार्ड व आधारकार्ड व त्यांचे
झेराॅक्स प्रतीसह इतर सर्व आवश्यक कागदपत्रासह प्रकरण “शिवतीर्थ” शिवसेना कार्यालय पाचोरा येथे दि. ३ सप्टेंबर ते दि.१२ सप्टेंबर पर्यंत सकाळी १० ते दुपारी ५ वाजेच्या दरम्यान जमा करावे. यानंतर प्राप्त सर्व प्रकरणे दररोज पुरवठा विभागाकडे वर्ग करून त्या प्रकरणांची चौकशी करून जे लाभार्थी खरोखर लाभापासुन वंचीत असतील त्यांना न्याय मिळवुन देण्यात येणार आहे.
यासंदर्भात कोणाची तक्रार किंवा शंका असेल तर त्यांनी शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांचा मो. 79723 29099 युवासेना जिल्हा संघटक पप्पु राजपुत यांच्याशी मो.9890845020 संपर्क साधावा असे आवाहन पाचोरा शिवसेना व युवासेनातर्फे मिडीया प्रमुख अजयकुमार जैस्वाल यांनी केले आहे.