पाचोरा तालुक्यातील पाच गावात सात जागांसाठी झाली पोटनिवडणुक

0

पाचोरा | प्रतिनिधी 

पाचोरा तालुक्यात दि. २३ रोजी नगरदेवळा येथे प्रभाग क्रमांक. ३ मध्ये नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी गढरी सचिन दामु (१११२), शिंपी घनश्याम मगन (३७२), नोटा (१७), स्री राखीव जागेसाठी शेख सैनाजबी अब्दुल आबिद (६३९), मिर्झा जैनुबी इब्राहिमबेग (४९९), शिंपी मनिषा घनश्याम (३३२), नोटा – (३१), प्रभाग क्रमांक – ४ मध्ये स्री राखु जागेसाठी महजन सुनंदा पोपट (६०२), पवार प्रमिला अर्जुन (५२६), रोकडे अभिलाषा भिला – (१००), नोटा – (४), कळमसरा सर्वसाधारण जागेसाठी पाटील कोकीळाबाई पांडुरंग (२७८), मोरे दिलीप राजु (२२९), नोटा (५), तारखेडा खु” सर्वसाधारण जागेसाठी पाटील भरत शंकर (३६०), पाटे रविंद्र दत्तात्रय (२३२), नोटा – (५), पिंपळगांव (हरे.) सर्वसाधारण जागेसाठी पाटील उदय संजीव (६०७), देव देवेंद्र भिला (२८५), नोटा – (४), आखतवाडे नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी राजपुत ललिता जितेंद्र (२६७), परदेशी संजय तुकाराम (२४३), नोटा – (४), आखतवाडे येथे राजपुत जितेंद्र यांचे जात प्रमाणपत्र वैध नसल्यामुळे जागा रिक्त झाली होती. मात्र पोटनिवडणुकीसाठी त्यांनी त्यांची पत्नी ललिता जितेंद्र राजपुत यांना निवडणुक रिंगणात उतरवुन २४ मतांनी निवडणुक जिंकल्याने सदस्य पद त्यांचेच घरात राहिले. याकामी तहसिलदार कैलास चावडे, निवडणूक नायब तहसिलदार अमित भोईटे, केंद्र अध्यक्ष राजु ढेपले, संजय साळुंखे, अजिंक्य आंढळे, समाधान पाटील, जितेंद्र महाजन, ईश्वर देशमुख यांनी मतमोजणीसाठी सहकार्य केले.

आठ ग्रामपंचायतीत १२ जागा बिनविरोध

पाचोरा तालुक्यात निवडणुक माघारीच्या दिवशी ८ गावांमध्ये १२ जागा बिनविरोध झाल्या होत्या. यात वाणेगांव (४), लोहारा (२), निपाणे, तारखेडा खु”, भोजे, गाळण बु”, वडगांव आंबे व ओझर येथील ग्रामपंचायतीची प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.