पाचोरा (प्रतिनिधी) : येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड. महेश देशमुख, व्हाईस चेअरमन विलास जोशी या पदाधिकाऱ्यांसह संस्थेच्या संचालक मंडळाने कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती संदर्भात मदतीसाठी एकमुखी निर्णय घेतला. त्याआधारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी ५१ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते उप विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांचेकडे सोपविण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन विलास जोशी, संजय सूर्यवंशी उपस्थित होते.