पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे शिक्षकांचा गौरव

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गो. से. हायस्कूलमधील शिक्षकांचा  सत्कार करून गुणगौरव केला.

याप्रसंगी नगरसेविका सुचेता वाघ, जिल्हा महिला प्रवक्त्या मंगला शिंदे, तालुकाध्यक्षा रेखा देवरे, जि. प. सदस्या स्नेहा गायकवाड, डॉ. सुनिता मांडोळे, सरला पाटील, सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्षा प्रा. वैशाली बोरकर यांनी उपस्थिती देऊन मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. ठाकरे, ए. बी. अहिरे, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख  मनीष बाविस्कर, कार्यालय अधीक्षक अजय सिनकर, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन .पाटील, ज्येष्ठ शिक्षक आर. बी. तडवी,  एस. पाटील, सौ. ए .आर. गोहिल, सौ. सी. बी. सूर्यवंशी, श्रीमती. एस. एस. पाटील, डी .डी. विसपुते, मयूर देवरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी  मंगला शिंदे, डॉ. सुनिता मांडोळे, स्नेहा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले व मनोगतातून विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाची भूमिका किती महत्वाची आहे हे सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एस .पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डी. डी. विसपुते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय पाटील, सागर महाजन व गौरव सोनवणे  यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here