पाचोरा आगाराची लोहारा-जळगाव मार्गावर एकमेव बसफेरी अचानक बंदने प्रवाशांची होतेय गैरसोय

0

परिवहन मंत्री याकडे लक्ष देतील काय?सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या विभागाकडून प्रवाशांच्या मानसिकतेचे हनन
लोहारा, ता.पाचोरा (ज्ञानेश्वर राजपूत) पाचोरा आगाराची लोहारा मार्गे जळगाव लोहाराहून जळगाव जाण्यासाठी सकाळी आठ वाजता एकमेव बसफेरी असताना ती अचानक बंद केली जाते यामुळे प्रवाशांची सेसेहपालट होत असल्याचे चित्र दिसत आहे. वेळेत बस न आल्याने प्रवाशांना ऐनवेळी खाजगी बसफेरीचा सहारा घ्यावा लागतोय एकीकडे अनुचित प्रकार झाल्यास रा.प.महामंडळ प्रवाशांना सुरक्षिततेची हमी देते आणि दुसरीकडे प्रवाशांचे मानसिक हनन केला जात असल्याचा प्रकार होत असल्याने जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी लाभार्थी व प्रवासी यांकडून होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की दळणवळनावावर मध्यान्न असलेले लोहारा हे गाव येथून बरेचसे प्रवासी,लाभार्थी जिल्ह्याच्या ठिकाणावर जातात याच मार्गावर कासमपुरा,नांद्राफाटा,रोटवद, रोटवदतांडा,मोहाडी,पळासखेडा मिराचे,नेरी अशी अगक्रमाने अजूनही पुढे गावे आहेत म्हणूनच खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा डेरा या मार्गावर वळला आहे पाचोरा आगाराची लोहारा मार्गे जळगाव एकमेव बसफेरी असतानाही बरीचसी प्रवाशी या बसची वाट पाहत बसतात मात्र ही बस फेरी कधीकधी अचानकपणे बंद केली जाते यामुळे बऱ्याचशा प्रवाशांचे नियोजन विस्कटत आहे दोन दिवसांपासून ही एकमेव बस बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू असून याबाबत पाचोरा आगाराचे आगार प्रमुख श्री.वाणी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की शाळेच्या सहलींचे योग सुरू आहे त्यात आगारात बस कमी प्रमाणात आहेत रविवार पासून ही बस फेरी सुरळीत चालू होईल असे त्यांनी सांगितले पण या जबाबात तथ्य दिसून येत नाही? तोपर्यंत या वेळेत अवलंबून राहणार्याना जीव मुठीत धरून खाजगी बसने प्रवास प्रवासी यांना करावा लागणार इतर मार्गावर जास्तीच्या बस फेरी आहेत त्या का बंद केल्या जात नाहीत? व याच मार्गावरील एकमेव बस फेरीचा गळा का घोटला जातो याबाबत रा.प. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करायला हवे प्रामुख्याने दैनिक पुण्यप्रताप समूह सातत्याने प्रकाशझोत टाकत आहे सदर प्रकाराबाबत परिवहन मंत्री यांनी जातीने लक्ष देऊन मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून हितचिंतक,लाभार्थी,प्रवाशांना न्याय द्यावा अशी मागणी या निमित्ताने होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.