निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : निपाणे परीसरात गेल्या १२ दिवसांपासून पेरणी वर पाऊस नसल्याने हलक्या जमिनीतील पिके अक्षरसा जळू लागली आहेत त्यामुळे शेतकरी वर्गावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. रोज ढगाळ वातावरण निर्माण होते पाऊस येईल असे वाटते परंतु पाऊस हुलकावणी देत निघून जात आहे.
त्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. यावर्षी चांगला पाऊस होण्याचे संकेत मिळाले असल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी बाजरी सोयाबीन उडीद मूग आदींची पेरणी करुन कोरड वाहू कपाशी मका लागवड केली. परंतु पाऊस हुलकावणी देत असल्याने कोवळी पिके कोमेजत असून काहींना कोऱ्या लागले आहेत.

आज ना उद्या पाऊस आला नाही तर पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांपुढे उभे राहणार कि काय या विवंचनेत शेतकरी वर्गाला पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र, आजही पाऊस आला तरी मर च्या ठिकाणी दुबार बियाण्यांची सांधा सांध करावी लागणार आहे. त्यामुळे आर्थिक खर्चाचा बोजा वाढणार असून शासनाने दुबार पेरणी साठी निपाणे परीसरातील शेतकऱ्यांसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

