पांढरद येथे गिरणेच्या पाण्यात बुङुन एकाचा मृत्यु

0

भङगाव | प्रतिनिधी
      गिरणा नदीच्या पाण्यात बुङुन एका ४५ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना घङली. ही घटना दि.१३ रोजी दुपारी दिङ वाजेच्या सुमारास घङली. याबाबत भङगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहीती अशी कि, गिरणा नदीला नुकतेच पाण्याचे आवर्तन सोङण्यात आले आहे. निंभोरा गावाहुन पांढरद गावी गिरणा नदीच्या पाण्यातुन चंद्रभान महारु कोळी वय ४५ वर्ष रा. पांढरद ता. भङगाव हे पाण्यातुन जात असतांना पाय घसरुन पाण्यात पङुन वाहतांना नागरीकांनी त्यांना  बाहेर काढले. माञ चंद्रभान महारु कोळी यांचा पाण्यात बुङुन मृत्यु झाला . त्यांना भङगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता ङाॅक्टरांनी मयत घोषीत केले.याबाबत भङगाव पोलीस स्टेशनला वसंत आत्माराम पाटील पोलीस पाटील  रा. पांढरद ता. भङगाव यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस हेङकाॅन्सटेबल भगवान बङगुजर हे करीत आहेत. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.