पंढरपूर: ‘राज्य सरकारच्या दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ लाभू दे! बळीराजाला तुझा आशीर्वाद मिळू दे आणि माझा महाराष्ट्राला सुजलाम्, सुफलाम् व संपन्न होऊ दे…’ असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूरच्या विठुरायाला घातलं.
आज प्रथम विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला. यानंतर विठ्ठलाची मंत्रोपचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्निक आणि लातूरचे शेतकरी विठ्ठल चव्हाण दांपत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि चव्हाण यांना विठ्ठलाची तुळशीची माळ देत पूजा संपन्न झाली.