पंढरपूर/जळगाव :- शिवसेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे असे साकडे श्री पांडुरंगाच्या चरणी घातल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या बहुतांश ग्रामीण भागामध्ये अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे अडचणीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणी केलेले पिक उगवेल की नाही याची चिंता आहे. या पार्श्वभूमीवर जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला काळया आईचे राखण करण्यासाठी सुखाचे दिवस येऊ दे असे साकडे घातल्याचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगीतले. दरम्यान प्रसिद्ध ज्योतिष भगरे गुरुजी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे यांनी नामदार गुलाबराव पाटील यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी ची प्रतिमा, शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ना.गुलाबराव पाटील यांच्या सोबत नारायण आप्पा सोनवणे , कैलास पाटील , धनंजय सोनवणे ( डंपी) , स्विय सहाय्यक गोविंद पाटील व अंगरक्षक प्रविण पाटील आदी उपस्थित होते.