पहूर ता जामनेर :- जातीय वाचक शिवीगाळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी पेठ मधील एका युवकाविरूध्द अट्रासिटी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठ मधील रहिवासी सचिन शिवदास मोरे हा त्याचे अन्य साथीदार आंबेडकर नगरच्या गेट जवळ बसलेले होते. यादरम्यान विशाल सुभाष पाटील त्या ठिकाणी येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरून बसलेल्या युवकांना जातीयवाचक शिवीगाळ केल्याची घटना मंगळवार रोजी रात्री घडली आहे.सचिन मोरे याच्या फिर्यादीवरून विशाल पाटील विरुद्ध अँट्रासिटी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.