पहूर:- येथे राष्ट्रीय चर्मकार समाजाच्या वतीने आयोजित मेळाव्यात १३० वधु वरांनि परिचय दिला अध्यक्षथानी भुसवळच्या नगरसेविका सरिता तायड़े होत्या. यावेळी जळगाव, औरंगाबाद, बुलढाणा, मालेगाव, कल्याण, मुंबई, नाशिक, सह बरहांनपुर येथून वधु वर उपस्थित होते.
यावेळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गलू बाबा ठोसर, डॉ संपत वानखेड़े, जामनेरच्या तालुकाध्यक्ष सिंधु सुरडकर, डी बी मोरे, खंडू काकड़े, गणेश राउत, ज्ञानदेव वानखेडे, ऐड अर्जुन वानखेडे, राष्ट्रवादीचे संजय गरुड, माजी सरपंच प्रदिप लोढा, शैलेश पाटिल, विवेक जाधव, माजी जी प सदस्य कैलास पाटिल, उपसरपंच रविंद्र मोरे, अमृत वानखेड़े कवि विश्वनाथ वानखेड़े, मधुकर आगरे, किरण खैरनार आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
यावेळी अमृत वानखेडे यांनी संत रोहिदास भवनासाठी दोन लाख रूपयांची देनगी जाहिर केली असून यावेळी समाजाच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला. मेळाव्यात साठ वधु तर सत्तर वरांनी परिचय दिला असून यातील दोन विवाह जुळनार असल्याची माहिती देण्यात आली तर काही एकमेकांच्या संपर्क त आहे. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ जितेंद्र वानखेडे, किशोर वानखेडे, रमेश शेकोकर, विजय सुरलकर, चिंतामन लोखंडे कैलास भारुडे, युवराज, वानखेडे, बालू वानखेडे भगवान वानखेडे नीलेश वानखेडे, किरण चिमकर यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन जितेंद्र वानखेडे, प्रास्ताविक अशोक सुरवाड़े, तर आभार माजी मुख्याध्यापक प्रल्हाद वानखेडे यांनी मानले