- मारहाणीच्या निषेधार्थ वैदयकीय अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
- जिल्हा शल्यचिकीत्सकांची रुग्णालयास भेट
रुग्णसेवा झाली ठप्प ; रुग्णालयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पहूर , ता . जामनेर | प्रतिनिधी
येथील ग्रामीण रुग्णालयात आधिपरिचारकास काल झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी वैदयकिय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आज शनिवारी काम बंद आंदोलन केले . यामुळे रुग्णांचे हाल झाले . तर दाखल झालेल्या रुग्णांना जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले . दरम्यान जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ .एन. एस . चव्हाण यांनी रुग्णालयास भेट देवून सदर घटनेची माहीती घेतली . यावेळी दोन कंत्राटी वैदयकिय अधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सादर केले.
केवडेश्वर महादेव मंदीराच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत काल पाच महिला जखमी झाल्या होत्या . त्यांच्यावर उपचारादरम्यान जिप सदस्य अमित देशमुख अधिपरी चार क आबादेव कराड यांच्यात वाद होवून हाणामारी झाल्याने पहूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता . या घटनेच्या निषेधार्थ आज ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने बाहय रुग्णसेवा ठप्प झाली.
यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय झाली . सकाळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ .एन.एस. चव्हाण यांनी भेट देवून पाहणी केली . तर रुग्णालयाचे वैदया किय अधिकारी डॉ . हर्षल महाजन व डॉ . मंजूषा पाटील यांनी राजीनामे दिले . दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत काम बंद आंदोतन चालूच राहील असे कर्मचाऱ्यांनी सांगीतले . सध्या डॉ . हर्षल चांदा यांच्याकडे पहूर ग्रामीण रुग्णालयाचा प्रभारी पदभार आहे . त्यांच्याकडे जामनेर व बोदवडचाही प्रभारी पदभार असल्याने पहूरच्या रुग्णांची गैरसोय होणार आहे.
दरम्यान अधिपरिचारक कराड यांच्यावरही जळगांवला उपचार सुरू आहेत . तथापी त्यांच्या विरूद्ध पहूर पोलीसात विनयभंग , जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


