पहूर, ता. जामनेर :- येथे अहिर सुवर्णकार समाज व गृप ग्रामपंचायत पहूर पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुय्यम निबंधक एस .पी. विसपुते होते. प्रारंभी संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले . यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा, धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील, आर .बी. पाटील, पत्रकार शरद बेलपत्रे, गणेश पांढरे, चेतन रोकडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपसरपंच रवींद्र मोरे, रोहयो तालुकाध्यक्ष समाधान पाटील, माजी विकासो चेअरमन पंडित सोनार, शांताराम लाठे, भाऊराव गोंधनखेडे, वासुदेव घोंगडे रविंद्र पांढरे, संदीप बेढे, राहूल पाटील आदींची उपस्थिती होती.
यशस्वीतेसाठी हिरालाल भामेरे, बापू बाविस्कर ईश्वर इखनकर सुभाष सोनार, शिवदास सोनार, भरत भामेरे, सुधाकर भामेरे, सुरेश भामेरे, गजानन इखनकर , नितीन सोनार आदींनी सहकार्य केले. प्रास्ताविक जितेंद्र मोरे यांनी केले. सुत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले. आभार गिरीष भामेरे यांनी मानले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते