शेंदुर्णी ता.जामनेर | प्रतिनिधी
सध्याच्या करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शासन, प्रशासन व स्थानिक पातळीवर असंख्य उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहरापासुन ते ग्रामीण भागात या करोनाचा प्रभाव जाणवत आहे. यावर उपाययोजना म्हणुनच पहुर येथील पोलीस ठाण्यात तोंडाला मास्क लावला तरच प्रवेश दिला जात आहे.या मुळे करोनाचा प्रभाव कमी होण्यासाठी मदत होईल. पहुर पोलीस ठाण्यात जवळपास ८०-९० गावांचा समावेश आहे. हायवेवर गाव असल्याने असंख्य नागरिक या ठिकाणी कामाच्या निमित्ताने येत असतात. आधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यात मोठ्या संख्येने येणारे नागरिक यांच्या मुळे करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणुन वरिष्ठांच्या आदेशानुसार पहुर पोलीस ठाण्यात सपोनि.राकेशसिंग परदेशी यांनी आता तोंडाला मास्क लावुनच पोलीस स्टेशनला प्रवेश मिळणार असे सांगत प्रवेशद्वाराजवळच तसा फलक लावला असुन तशी काटेकोरपणे अंमलबजावणी सुद्धा सुरु असुन यामुळे आता सर्वच जण यामुळे तोंडाला मास्क लावुनच प्रवेश करत आहे. नागरिकांनी करोनाला परतवुन लावण्यासाठी तोंडाला मास्क, वेळोवेळी हात धुळे,सोशल डिस्टंशीनचा वापर करावा असे आवाहन सपोनि. राकेशसिंग परदेशी यांनी केले आहे.